Headlines

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला येणार दुर्मिळ योग! ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला येणार दुर्मिळ योग! ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला येणार दुर्मिळ योग! ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास


Akshaya Tritiya 2026 : हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते, कारण तो दिवसच अत्यंत शुभ मानला जातो… म्हणून इतर सणांप्रमाणे अक्षय्य तृतीयेला देखील तितकंच महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, जर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं तर त्याचे कधीही न संपणारे म्हणजेच अक्षय्य फळ मिळतं. यावर्षी अक्षय तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी आहे. अक्षय्य तृतीयेला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.

अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे, जे कधीही कमी होत नाही किंवा कधीही नाहीसं होत नाही. त्यामुळे, असं मानलं जातं की, या दिवशी केलेल्या कामांचे फळ दुप्पट मिळतं. अशा प्रकारे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग तयार होतात. म्हणूनच ही अक्षय्य तृतीया खूप महत्त्वाची आहे. या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतो आणि मालव्य राजयोग तयार होतो.  हा योग काही राशींसाठी शुभ असेल. चला पाहूया त्या राशी कोणत्या आहेत.

सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठ्या यशाचा आहे. समाजात तुमच्या कौशल्यांची प्रशंसा होईल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या काळात कुटुंबातील मतभेद दूर होतील.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात स्थिरता, आनंद आणि शांती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्यांना नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे. या काळात सर्व काही अनुकूलपणे पार पडेल.

धनु: या काळात सुखसोयी वाढतील. तुम्ही स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

मेष: अक्षय तृतीयेला मेष राशीच्या लोकांना व्यावसायिक प्रगती दिसून येईल. नोकरीत बदल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *