Headlines

Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह

Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह
Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना 1962 च्या चीन-भारत युद्धाचा संदर्भ देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. 9 एप्रिल 1962 रोजी नेहरूंनी आसामला “टाटा बाय-बाय” म्हटल्याचा उल्लेख करत शाह म्हणाले की, “जवाहरजी, ही तुमची वैयक्तिक भूमी नव्हती, तर भारतमातेचा अविभाज्य भाग असलेले आसाम आहे.”
यावेळी त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करत ठामपणे सांगितले की, “जोपर्यंत नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत भारताची एक इंचही जमीन कुणालाही बळकावता येणार नाही.” शाह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, विशेषतः ईशान्य भारतातील सीमावाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यांच्या भाषणातून देशाच्या सीमांच्या सुरक्षेबाबत सरकारची कठोर भूमिका अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळाले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *