AUS vs IND : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, फायनलमध्ये कांगारुंचा 17 धावांनी धुव्वा

AUS vs IND : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, फायनलमध्ये कांगारुंचा 17 धावांनी धुव्वा
AUS vs IND : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, फायनलमध्ये कांगारुंचा 17 धावांनी धुव्वा


वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 17 धावांनी मात केली आहे. स्मृती मंधाना हीच्या 82 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 176 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टीम इंडियाने यासह इतिहास घडवला आहे. भारताची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी वूमन्स टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात कोणतीही मालिका जिंकता आली नव्हती. मात्र हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

स्मृती मंधानाची विस्फोटक बॅटिंग

टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजी निवडली. भारतासाठी तिघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. स्मृती मंधाना हीला शतकाची संधी होती. मात्र स्मतीचं शतक 18 धावांनी हुकलं. स्मृतीने 55 बॉलमध्ये 82 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 8 फोर लगावले. जेमीमाह रॉड्रिग्स हीने अर्धशतक झळकावलं. जेमिमाहने 46 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. तर ऋचा घोष हीने अखेरच्या क्षणी 18 धावांनी निर्णायक खेळी केली.

टीम इंडियाची कडक बॉलिंग

भारतीय गोलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला झटपट मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ठोस सुरुवात मिळाली नाही. जॉर्जिया वॉल हीने 10 तर बेथ मुनीने 6 धावांचं योगदान दिलं. फोबी लिचफिल्ड हीला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिला मोठी खेळी करण्याआधीच आऊट केलं. फोबीने 26 धावा केल्या.

एलिसा पेरी 1 रनव आऊट झाली. जॉर्जिया वॉरहम हीने 12 तर अन्नाबेल सदरलँड हीने 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एश्ले गार्डनर हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. गार्डनरने अर्धशतक झळकावलं. गार्डनरने 45 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह एकूण 57 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांसमोर विजयी धावांपर्यंत पोहचता आलं नाही. टीम इंडियासाठी श्री चरणी आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. अरुंधती रेड्डी हीने कांगारुंच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणुका सिंह ठाकुर हीने 1 विकेट मिळवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *