वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य..
आज दि.13/5/2024 रोजी सायं. 4.05 वा. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी 107 कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला. वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे बऱ्याच ठिकाणी झाडे व झाडांच्या मोठ्या…