मुलीला शेजारी बसवून आई दिवसभर चालवते रिक्षा, मुलीला पोलिस अधिकारी बनवण्याचे स्वप्न !
आपल्या लहानग्या मुलीला सांभाळायला कोणी नसल्याने एका मातेने तिला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्याची कसरत केली आहे. या महिलेची सासु आजारी असल्याने तिचे पती गावीच राहत आहेत. त्यामुळे तीन वर्षांची मुलगी तेजस्वी हीला सोबत ठेवूनच त्या दिवसभर रिक्षा चालवून अर्थार्जन करत असल्याने या मायलेकींचा अनोखा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे आपल्या लहानग्या मुलीला…