
Balasaheb Thackery Death Shocking claim Ramdas Kadam: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे (Dasara Melava 2025) गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे. रामदास कदम यांनी शिंदे गटाच्या नेस्को सेंटर येथील दसरा मेळाव्यात एक प्रचंड स्फोटक विधान केले. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह हातांचे ठसे घेण्यासाठी मातोश्रीवर तसाच ठेवून देण्यात आला होता, असा सनसनाटी आरोप रामदास कदम यांनी केला. दसरा मेळावा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला.
यावेळी रामदास कदम यांना, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दोन दिवस आधीच झाला होता, ही माहिती तुम्हाला कोणी दिली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर रामदास कदम यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मी जे वक्तव्य केलं, ती माहिती मला डॉक्टरांनी दिली. ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांनीच मला हे सांगितले. मातोश्रीवरही तशी चर्चा होती. ‘ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है’. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणार. अजून खूप काही आहे, आम्ही हळूहळू सगळं बोलणार. हे तर काहीच नाही. जेवढं माझ्या मुलाच्या मागे लागणार ना, तेवढं मी अजून बोलणार. शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले. माझ्या मुलाच्या मुळावर उठताय, राजीनामा मागताय, फक्त एकटयाला टार्गेट करताय. मी मातोश्रीत 55 वर्ष काढली आहेत. तुम्ही किती वेळा बॅगा भरून जात होतात, हे सर्व माहित आहे. सूड भावनेने तुम्ही वागत आहात, असेही कदम यांनी म्हटले.
Ramdas Kadam news: रामदास कदमांनी नेमका कोणता स्फोटक आरोप केला?
शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठं विधान करतोय याची जाणीव मला आहे. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पारकर यांना विचारा. त्यांनीच मला हे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचं काय चाललं होतं? आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो. मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? कोणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? त्यावेळी मातोश्रीवर या सगळ्याची चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, काढा सगळी माहिती, असे रामदास कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा