Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active

Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active
Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active


इस्रायलला इराण विरोधात बलूचिस्तानचा वापर करायचा आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आणि जियो न्यूजचे अँकर हामीद मीर यांनी असा दावा केला आहे. त्यांनी आपला शो कॅपिटल टॉकमध्ये कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद बलूचिस्तानात अस्थिरता निर्माण करुन इराणमध्ये हस्तक्षेप करण्याच्या रणनितीवर काम करत आहे.  हामीद मीर यांनी इस्रायली वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा हवाला दिला. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलय की, बलूचिस्तान इराणच्या सीमेला लागून आहे. तिथूनच इराणला अस्थिर केलं जाऊ शकतं. त्याशिवाय त्यांनी कतरच आंतरराष्ट्रीय चॅनल अल जजीराच्या रिपोर्टचा हवाला दिला.

त्या रिपोर्टमध्ये म्हटलय की, इस्रायलला बलूचिस्तानातील स्थिती हायजॅक करायची आहे. मीर यांच्यानुसार या रिपोर्ट्समधून स्पष्ट संकेत मिळतायत की, इराणला कमकुवत करणं हा इस्रायलचा खरा उद्देश आहे. कार्यक्रमात हामीद मीर यांनी आणखी एक सनसनाटी दावा केला. बलूचिस्तानातील एका मोठ्या राजकीय नेत्याने स्वत: त्यांना सांगितलय की, त्यांचा भाऊ मागच्या काही वर्षात तीनवेळा इस्रायलला जाऊन आलाय. आता तो एका पाश्चिमात्य देशात राहतोय. मीर यांच्यानुसार हैराण करणारी बाब ही आहे की, त्या व्यक्तीच्या पासपोर्टवर इस्रायल प्रवासाचा कुठलाही शिक्का नाहीय.

बलूचिस्तान कारवायांचं केंद्रस्थान का बनतं?

मीर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पॅनलिस्टनी सुद्धा या दाव्यावर सहमती व्यक्त केली. PML-N नेता जरीन मगसी म्हणाले की, बलूचिस्तानातील दहशतवादामागे परदेशी शक्तींचा हात आहे. सुरक्षापथकांच्या कारवाईत आता पर्यंत 200 दहशतवादी मारले गेलेत. बलूचिस्तान अवामी पार्टीचे (BAP) वरिष्ठ नेते कहदा बाबर म्हणाले की, “बलूचिस्तानच्या रणनीतिक महत्वामुळेच ते कारस्थानाचं केंद्र बनतं. अमेरिका आणि अन्य देश BLA सारख्या संघटनांना दहशतवादी मानतात. पण त्यांच्याविरुद्ध कुठली ठोस कारवाई करत नाही” असं म्हणाले.

मागच्या दोन-चार दिवसात बलूच बंडखोरांनी पाकिस्तानला हादरवून सोडलय. त्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर हे बलूच बंडखोर भारी पडतायत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *