
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियम निश्चित केले आहेत. बँकेच्या लॉकरच्या 2 चाव्या असतात, एक चावी ग्राहकाकडे असते आणि दुसरी चावी बँकेकडे असते.मात्र याशिवाय, या चावीसाठी डुप्लिकेट चावी नसते. मुख्य म्हणजे ‘बँक लॉकर’ तेव्हाच उघडतो जेव्हा दोन्ही चाव्या एकत्र वापरल्या जातात. या कारणास्तव, ग्राहकाची चावी हरवल्यास लॉकर सहसा उघडता येत नाही.मग जर ग्राहकाकडची चावी हरवील, तर अशा परिस्थितीत काय करायचं , तेव्हा लॉकर कसा उघडता येईल?