Baramati | रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक थेट बारामतीत; लवकरच…

Baramati | रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक थेट बारामतीत; लवकरच…
Baramati | रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक थेट बारामतीत; लवकरच…

अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या घटनेवरून राज्यातील राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध नेते आणि पक्षांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी त्यांनी अपघातामागे 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडले. या आरोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

दरम्यान, आज बारामती येथे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षित आहे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अधिकृत अहवालावर अवलंबून असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *