
प्रभूने घरातील एका सदस्याला थेट सांगितलं की, “मला तू आवडलीस!” त्याने तिच्यासमोर जाऊन स्पष्टपणे म्हटलं, “मला तू आवडलीस म्हणून मी तुझ्या मागे लागलो आहे.” यावर त्या सदस्याने विचारलं, “मला तू आवडलीस म्हणजे काय? ताई म्हणून का?” प्रभूने ताबडतोब उत्तर दिलं, “नाही, ताई नाही. आता ताईचा शॉट संपला. मी तन्वीला सोडून आता तुला धरलंय. ती ताईच आहे, पण आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस!”