Rapido Driver Misbehave: बाइक आणि टॅक्सी सेवा देणारी रॅपिडो ही कंपनी पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. अलीकडेच एका महिलेने सोशल मीडियावर रॅपिडो कंपनीकडे त्यांच्या चालकांना ड्रेस कोड देण्याची मागणी केली होती. महिलेने सांगितले होते की, बाईक चालवणारे ड्रायव्हर ड्रेस कोडशिवाय येतात, त्यामुळे शेजारच्या लोकांना वाटते की महिलेचे वेगवेगळ्या लोकांशी संबंध आहेत. आता आणखी एका महिलेने रॅपिडोबाबत तक्रार केली आहे. या महिलेने जादा भाडे मागण्याबाबत विचारणा केली असता रॅपिडो चालकाने तिला शिवीगाळ केली. आता या महिलेने ड्रायव्हरसोबतच्या चॅटचा स्क्रिनशॉट शेअर करून कंपनीची कोंडी केली आहे.
रॅपिडो ड्रायव्हरने दिली धमकी
ओशिनी भट्ट नावाच्या महिलेने रॅपिडोमध्ये इकॉनॉमी क्लास बुक केला होता, जो किफायतशीर आहे. पण कंपनीने महिलेसाठी प्रीमियम कार बुक केली, ज्याचे भाडे खूप जास्त आहे. त्याचवेळी ड्रायव्हरने काहीतरी चूक केल्याचे महिलेला स्पष्ट झाले. ड्रायव्हरने महिलेला भाडे विचारले असता भाड्याची रक्कम पाहून तिला धक्काच बसला आणि तिने भाडे देण्यास नकार दिल्यानंतर चालकाने आपला आगाऊपणा दाखवण्यास सुरुवात केली. महिलेने सोशल मीडियावर चॅटचे स्क्रिनशॉर्ट शेअर केले आहे. “रद्द करा नाहीतर…., भिकाऱ्याची मुलगी, स्वस्त हवे असेल तर पायी जा.”
महिलेचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया
आता या महिलेचा हा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत आहेत. युजर्सनी महिलेला ड्रायव्हर विरोधात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे आणि या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, असे महिलेने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मी रॅपिडोवर इकॉनॉमी बुक केली होती, पण एक प्रीमियम कार मिळाली. (ड्रायव्हरने बुक केले. इकॉनॉमी टाईप मी एक राइड बुक केली जेणेकरून त्याला आणखी राइड मिळतील, पण मी नकार दिला आणि त्याला राइड रद्द करण्यास सांगितले, म्हणून त्याने माझ्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
युझर्सने केले कमेंट
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कंपनीने म्हटले आहे की, “आमच्या कंपनीमध्ये अशा प्रकारची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आम्ही आमच्या सर्व प्रिय ग्राहकांना आश्वासन देतो की, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.” त्याचबरोबर सोशल मीडिया यूझर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा चालकाला तात्काळ सेवेतून काढून टाकण्याची मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे. तसेच, युझर्सनी रॅपिडोला आपली प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.