Headlines

बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूक! दोन शिवसेनेची अजब युती, ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनेलमध्ये शिंदे गटाची महिला  

बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूक! दोन शिवसेनेची अजब युती, ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनेलमध्ये शिंदे गटाची महिला  
बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूक! दोन शिवसेनेची अजब युती, ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनेलमध्ये शिंदे गटाची महिला  


BEST credit society election : बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत दोन शिवसेनेची अजब युती पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनेलमधून शिवसेना शिंदे गटाची महिला पदाधिकारी निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा संघटिका बबिता पवार यांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये समावेश झाला आहे. बबिता पवार या शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या जवळच्या कार्यकर्ता आहेत. बबिता पवार यांना पॅनेलमध्ये घेतल्याने ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. 

बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तरच तिची उमेदवारी कायम ठेवा

बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तरच तिची उमेदवारी कायम ठेवा, अन्यथा तिला पॅनेलमधून बाहेर काढा असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज वरिष्ठांची भेट घेवून नाराजी कळवल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. 

मराठी अस्मिता आणि कामगारांच्या हक्कांसाठी युती

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली होती. ही युती मराठी अस्मिता आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याच्या उद्देशाने केली गेली आहे. सध्या बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. गेल्या नऊ वर्षांत कामगार कल्याणासाठी केलेल्या कामामुळे त्यांना पाठिंबा आहे, आणि आता मनसेच्या सहभागाने ही ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी ‘उत्कर्ष पॅनेल’ अंतर्गत बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी युती केली आहे. ही निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. बबिता पवार, ज्या शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा संघटिका आणि माजी आमदार यामिनी जाधव यांच्या जवळच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना ठाकरे गटाच्या उत्कर्ष पॅनेलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. cठाकरे गटातील काही स्थानिक पदाधिकारी बबिता पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत, कारण त्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करावा, अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *