Headlines

BEST Employees Credit Society Election: ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मैदानात; 'बेस्ट' पतपेढी निवडणूक रंजक वळणावर!

BEST Employees Credit Society Election: ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मैदानात; 'बेस्ट' पतपेढी निवडणूक रंजक वळणावर!
BEST Employees Credit Society Election: ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मैदानात; 'बेस्ट' पतपेढी निवडणूक रंजक वळणावर!


BEST Employees Credit Society Election: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी येत आले आहेत. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना  आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता भाजपकडून सहकार पॅनलतर्फे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर उतरले आहेत. बेस्ट पतपेढी निवडणूक ठाकरेंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलं असून भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे. 

मी 20 वर्ष सहकारात, सहकार आम्हाला नवीन नाही

दरम्यान, भाजपकडून पॅनेल उतरवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड म्हणाले की, सहकारात पक्ष न आणण्याचा नियम सगळ्याच नेत्यांनी आणला. सोसायटीच्या निवडणुकीत दोन भाऊ ठाकरे ब्रँड एकत्र आले आहेत. सहकारात पक्ष न आणण्याचा नियम सगळ्याच नेत्यांनी आणला. माझी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच इतर पाच संघटना एकत्र आम्ही निवडूक लढत आहोत.सहकारात उद्धव ठाकरे यांच कर्तृत्व शून्य आहे. जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी देखील प्रसाद लाड म्हणून या पाच पांडवांचा कृष्ण म्हणून लढायला तयार आहे. मी 20 वर्ष सहकारात आहे प्रवीण दरेकर देखील सहकारी बँकेत 25 वर्षापासून आहेत सहकार आम्हाला नवीन नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार आहे.

कोण किती जागा लढवणार?

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. बेस्टच्या पतपेढी निवडणुकीच 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा आहेत.

बेस्टमध्ये युती, महापालिकेचं काय? 

ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितलं आहे. युती संदर्भातील निर्णय पक्षाच्या पातळीवर होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *