Headlines

भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी नाकाबंदीमध्ये सोने चोरल्याचा बनाव

भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी नाकाबंदीमध्ये सोने चोरल्याचा बनाव
भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी नाकाबंदीमध्ये सोने चोरल्याचा बनाव


Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) अंधेरीत पूर्वेतील एमआयडीसी परिसरामध्ये (MIDC premises) भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी (gold ) केल्याची घटना घडली आहे. भावाने एक किलो सोने एमआयडीसी परिसरात हॉलमार्क (Hallmark) करण्यासाठी आपल्या दुसऱ्या भावाला देऊन पाठवले  होते. मात्र आरोपी भावाने आपल्या भावाचा विश्वासघात करत एक किलो सोने पोलिसांनी नाकाबंदीमध्ये चोरी केल्याचा बनाव केला होता. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण काय त्याबाबतची माहिती.

नेमकं प्रकरण काय?

एमआयडीसी नेल्कोजवळील नाकाबंदीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी सोन्याची चोरी केल्याचा बनाव करुन आरोपीने खोटी तक्रार केली होती. नाकाबंदीमध्ये पोलिसांनी एक किलो सोना चोरी केल्याचा तक्रार मिळतच एमआयडीसी पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही तपासून आरोपी खोटा बोलत असल्याचं दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी स्वतःच्या कारमध्ये सोने लपवल्याची कबुली दिली आहे. आरोपी हा पोलिसांना तक्रार देताना गुंगारा घालून त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानामधून हॉलमार्क मारुन एक किलो सोने ब्रिझा कारमध्ये घेऊन येत होता. यावेळी अंधेरी एमआयडीसी नल्को परिसरात पोलिसांचे नाकाबंदी होती. पोलिसांनी नाकाबंदीमध्ये ब्रिझा कारमधून सोने तपासून सोन्याचे बिल मागवले. यावेळी बिल नसल्यामुळे पोलिसांनी सोने आपला ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगित आरोपीने पोलिसांना गुंगारा दिला. 

एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करुन केली कारवाई

आरोपी भावाने आपल्या भावाचा विश्वासघात करत एक किलो सोने पोलिसांनी नाकाबंदीमध्ये चोरी केल्याचा बनाव केला होता. यानंतर त्याने एमआयडीसी पोलिसामध्ये तक्रार दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले असता त्या परिसरात कुठलेही पोलीस फिरताना दिसून आले नाहीत. त्यामुळं हा आरोपी खोटा बोलत असल्याचं पोलिसांना निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपी सूर्यदेव त्रिपाठी याने स्वतः कट रचून हा बनाव करुन तब्बल एक किलो सोने चोरी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) आरोपी सूर्यदेव त्रिपाठी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(2)318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करून चोरीला गेलेल्या एक किलो सोना रिकव्हर केली आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढील तपास  करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

दोन अज्ञात महिलांची धाडसी चोरी, सोने खरेदीचा बहाणा करत मारला डल्ला, शिरुरमधील मांडवगण फराटा येथील घटना

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *