Bhiwandi Mayor Election | भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ

Bhiwandi Mayor Election | भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
Bhiwandi Mayor Election | भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ


भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली असून या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील सहा नगरसेवकांची मतं फुटल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर नारायण चौधरी यांनी महापौरपदाची बाजी मारली. महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना एकूण 48 मते मिळाली. त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत नंदिनी गायकवाड, अबुसाद शेख, दीपा मढवी, अश्विनी फुटाणकर आणि सुहास नकाते यांची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बंडखोर नगरसेवक हे आमदार महेश चौगुले यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उपमहापौर पदासाठी भाजपने दिलेला उमेदवारही काँग्रेसने फोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भिवंडीतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *