
इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार, शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. तसेच, श्वेतपत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा केरोसीन पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल 2026 या कालावधीत राज्यातील तीनही सरकारी तेल कंपन्यांमार्फत केरोसीनचे वितरण केले जाणार आहे. यासोबतच, एकूण केरोसीन वाटपापैकी 85 टक्के साठा पहिल्या पंधरवड्यातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.