कंत्राटी कामगार (Contract Employees) : राज्यातील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, सरकारी कामकाज या कर्मचाऱ्यांकडून वर्षानुवर्ष करून घेतले जाते, मात्र एकीकडे नियमित सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप सारखेच आहे मात्र तरीदेखील यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही, अल्प मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract Employees ) सेवेत कायम करण्यासाठी व समान काम समान वेतन देण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढला जावा यासंदर्भात विधानभवन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहे.
Contract Employees राज्यातील – आपत्कालीन परिस्थिती मध्ये तसेच सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबावणी करण्यासाठी हे कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यामध्ये कोरोना सारख्या महामारी मध्ये आणि नुकताच झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यात आपत्कालीन परस्थिती यामध्ये वेळोवेळी कंत्राटी कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांसारखे सेवेत कायम करून 7 व्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी शासन दरबारी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले आहेत, राज्यातील काही विभागातील रोजंदारी, हंगामी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम देखील केले आहे. राजस्थान, ओडिसा, मणिपूर, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय कसा घेतला?