Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याचे समोर आले आहेत. छगन भुजबळ हे नागपुरातील अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतले आहेत. तसंच, ते समर्थकांसोबत चर्चा करुन ते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी आज माध्यमांसमोरच ते नाराज असल्याची कबुली दिली. तसंच, त्यांनी मोठा दावादेखील केला आहे.
छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पक्षावरील नाराजीचीहे संकेत दिले आहे. मंत्रिपद कोणी नाकारलं ते असलं तरी पक्षाचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली तो आहे, असं भुजबळांनी म्हटलं आहे. तसंच, भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपचा विरोध होता का? यावरही ते स्पष्ट बोलले आहेत.
मंत्रिमंडळात भुजबळांना संधी देण्यास भाजपचा विरोध होता का, या प्रश्नांवर भुजबळांनी उत्तर दिलं आहे की, ‘मला जे काही कळलं ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा असा आग्रह धरला होता. हे मी कन्फर्म करुन घेतलं आहे.’ असं म्हटलं आहे.
मंत्रिमंडळावरुन सस्पेन्स
15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. सुरुवातीपासूनच मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरुन संस्पेन्स होता. काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, जुन्या मंत्र्यांना डावलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाहीये. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. तसंच, मंत्री धनंजय मुंडे यांनादेखील शेवटच्या क्षणी फोन आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी घेतली शपथ
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
आदिती तटकरे
नरहरी झिरवाळ
दत्ता भरणे
हसन मुश्रीफ
बाबासाहेब पाटील
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे