Headlines

भाजप नेते प्रविण दरेकर अडकले लिफ्टमध्ये, कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका, लिफ्टची क्षमता 10 जणांची पण चढले 17 जण

भाजप नेते प्रविण दरेकर अडकले लिफ्टमध्ये, कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका, लिफ्टची क्षमता 10 जणांची पण चढले 17 जण
भाजप नेते प्रविण दरेकर अडकले लिफ्टमध्ये, कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका, लिफ्टची क्षमता 10 जणांची पण चढले 17 जण


Pravin Darekar :  महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर हे आज वसईत तब्बल 10 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते. या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते. दरम्यान, दरेकड लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून दरेकरांची सुटका केली. 

लिफ्टची क्षमता 10 जणांची असूनही लिफ्टमध्ये 17 जण होते

मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टची क्षमता केवळ 10 जणांची असूनही त्यामध्ये 17 जण चढल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली. परिणामी लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण चिंताग्रस्त झाले. पण अखेर 10 मिनीटांनतर सर्वांची सुटका झाली आहे. घटनेनंतर कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. लोंखंडी रॉडच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला.  लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर प्रविण दरेकर आणि राजन नाईक यांनी पाणी पिऊन विश्रांती घेतली. या घटनेमुळे कार्यक्रमातही काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पुढे शिबिर सुरळीत पार पडले.

महहत्वाच्या बातम्या:

सोन्याचा चमचा, भरलेलं ताट, सभागृहात ठाकरे-शिंदेंची जुगलबंदी; प्रवीण दरेकरांची एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग

 

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *