BMC | एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

BMC | एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
BMC | एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष


मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेने ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे ठाम आग्रह धरला असून तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान एक नगरसेवक मनसेचा असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, महापालिका निवडणुकीदरम्यान मनसेने अत्यंत मोजक्या जागांवरच उमेदवार उभे केले, जेणेकरून युतीमध्ये कोणताही वाद किंवा पेच निर्माण होऊ नये. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान मनसेने कोणताही अडसर आणला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत मनसेचा सहभाग राहावा, हीही पक्षाची अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेत या मागणीवर अंतर्गत चर्चा सुरू असून, याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून युतीतील समन्वय आणि राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या मागणीवर ठाकरे सेनेचा काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *