Headlines

BMC Housing Lottery: मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज विक्री, कुठे अन् कसा अर्ज कराल, A टू Z प्रोसेस

BMC Housing Lottery: मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज विक्री, कुठे अन् कसा अर्ज कराल, A टू Z प्रोसेस
BMC Housing Lottery: मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज विक्री, कुठे अन् कसा अर्ज कराल, A टू Z प्रोसेस



BMC Housing Lottery मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी (BMC Housing Lottery) काढण्यात येणार आहे. यासाठी आजपासून (16 ऑक्टोबर) 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असतील.

26 ते 38 चौरस मीटर चटई क्षेत्र व अल्प आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत 54 लाखांपासून 1 कोटी 12 लाखांपर्यंत आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अन्वये प्राप्त 426 सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री- (BMC Housing Lottery)

16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जदारांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल.पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल. सोडतीसंदर्भात माहिती पुस्तिका 16 नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

घरे कुठे आहेत? (Where Is bmc lottery home location)

  1. भायखळा 
  2. गोरेगाव 
  3. अंधेरी 
  4. जोगेश्वरी 
  5. कांदिवली 
  6. दहिसर 
  7. कांजूरमार्ग 
  8. भांडूप

कुठे कराल अर्ज? (How To Apply BMC House Lottery)

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही पारदर्शक सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. या सदनिका अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असतील, ज्यामुळे मुंबईतील सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. सदनिका विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महानगरपालिकेला 800 मिळाली घरे- (BMC Home In Mumbai)

विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4 हजार चौरस फुटापेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून विकासकाने 80 टक्के घरांची विक्री केल्यानंतर महानगरपालिकेला 20 टक्के घरे पालिकेला मोफत देणे अनिवार्य आहे. यानुसार महानगरपालिकेला 800 घरे मिळाली आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *