Headlines

मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी (OBC) समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र शेतकऱ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र, शासनाच्या या जीआरची होळी करत ओबीसी समाजाने आपला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्यावतीने ओबीसींसाठी देखील मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली असून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांना या समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे. या समितीमध्ये मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, संजय राठोड यांसह आणखी नेते आहेत. आता, उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी समाजासाठी काल मंत्रिमंडळ उपसमिती जाहीर केली, त्यात भुजबळ, पंकजा मुंडे असे सर्व नेते आहेत. मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा केंद्रात दिला आहे. ओबीसींच्या योजना कार्यान्वित आहेत का, निधी आहे का? याची देखरेख करण्याची या समितीची जबाबदारी आहे. ओबीसी समाज आहे, त्यात काहींना प्रमाणपत्र मिळत नाही, जात पडताळणी होत नाही, अशा घटकांसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

काँग्रेसने आतापर्यंत तोंडाच्या वाफा फेकल्या आहेत, जातिनिहाय जनगणना केली नाही. आता ओबीसीमध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जातीमधील ओबीसींची जनगणना आहे, त्यात सरकारची काय मदत लागेल हे समिती पाहिल. त्यासोबत आमची भूमिका आहे, मराठा व ओबीसी या दोन्हींची भूमिका आहे. कुणाच्याही ताटातील कुणाच्या ताटात जाणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आता दोन समाजाला समोरासमोर न येता, दोन्हींचे हक्क न डावलता न्याय देण्याचे काम करायचे आहे. कुणाचे हक्क कुणाला जाणार नाहीत, परवाच्या जीआरमध्ये स्पष्ट आहे. ज्या नोंदणी आहेत, त्या दुर्लक्षित राहिल्या, त्यामुळे दाखले देत नव्हते. या जीआर मुळे ज्या नोंदणी गॅझेटमध्ये आहेत, त्या तपासून नोंदणीप्रमाणे ओबीसी प्रमाण पत्र मिळणार आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. आताच्या आंदोलकांची मागणी हीच होती, ज्या नोंदणी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या. वडिलांची नोंद असेल तर मुलाच्या नोंदीची गरज नाही, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

महायुतीत एकनाथ शिंदे भक्कमपणे पाठिशी

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रसद पुरवली का? असा सवाल महसूलमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही बावनकुळेंनी उत्तर दिलं. आता राजकीय बोलायचे असेल तर, संजय राऊत यांनी कितीही आमच्या महायुतीत तोंड खुपसले तरी महायुती भक्कम आहे. ते कपड्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थिर राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. जी जी मदत लागतेय, त्यासाठी एकनाथ शिंदे हे पाठिशी भक्कम उभे आहेत. ज्यांनी 2019 मध्ये फडणवीसांना धोका दिला, त्यांनी आमचा विचार करू नये, असे म्हणत बावनकुळेंनी संजय राऊतांवर पलटवार केला.

हेही वाचा

बेकायदा मुरुम उपशाला पाठबळ, लाडक्या बहि‍णींचा भाऊ म्हणणारे अजित दादा धटींगशाही करतात; शेतकरी संघटना आक्रमक

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *