Headlines

केंद्राचा GST कपातचा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफला चोख प्रत्त्युत्तर; एकनाथ शिंदेंनी सांगितलं गणित

केंद्राचा GST कपातचा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफला चोख प्रत्त्युत्तर; एकनाथ शिंदेंनी सांगितलं गणित
केंद्राचा GST कपातचा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफला चोख प्रत्त्युत्तर; एकनाथ शिंदेंनी सांगितलं गणित


मुंबई : केंद्र सरकारने जीएसटीच्या (GST) स्लॅबमध्ये मोठा बदल केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्यांना दिवाळीची भेट देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST 2.0 अंतर्गत अनेक मोठ्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली. त्यानुसार, आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. मोदी सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात असून राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला. तसेच, अमेरिकेच्या ट्रम्प (Donald trump) टॅरिफला भारताने चोख उत्तर दिलंय, असेही शिंदेंनी म्हटले.

जीएसटी स्लॅब कपातीच्या निर्णयाचा विरोधक देखील फायदा घेणार आहेत, त्यामुळे टीका करताना विरोधकांना मोदीजींच अभिनंदन करावंच लागेल. खऱ्या अर्थाने देशवासीयांची दिवाळी गोड आणि आनंदी करण्याचं काम प्रधानमंत्री मोदींनी केलेलं आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि जीएसटी कमी केलेला आहे. आता जे स्लॅब होते 5,12,18 आणि 28 आता फक्त 5 आणि 18 हे दोनच स्लॅब राहणार आहेत. त्यामुळे विमा पॉलिसीपासून जीवनाश्यक वस्तूंना केवळ 5% जीएसटी आहे, सर्व सामान्यांना लागणाऱ्या गरजा आणि वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे, असेही शिंदेंनी सांगितले.

दोनच स्लॅब ठेवल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशवासीयांना दिलासा मिळालेला आहे, 28% शेवटचा स्लॅब होता, मधला 12% होता, आता दोनच स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल. त्यामुळे दळणवळण वाढीस लागेल, खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. सर्वसामान्य ग्राहकाला बाजारपेठेतील खरेदीत फायदा होणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने जो टॅरिफ लावलेला आहे, त्याचे जे नुकसान आहे ते अमेरिकेला होईल. या ट्रम्प टॅरिफमुळे भारत आत्मनिर्भर्तेकडे जातोय, भारत सक्षम होईल. ट्रम्पच्या टेरीफला चोख उत्तर दिल्याचं जीएसटीच्या निर्णयावरून दिसून येतं, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

भारत आर्थिक महासत्तेकडे जाईल

प्रधानमंत्री म्हणाले होते की, या देशाचे जे शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल त्याबाबतीत कुठलीही तडजोड असेल ती या ट्रम्प टॅरीफमुळे केली जाणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित राहतील. मोदींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, ते बोलतात तसंच करतात. आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवरुन 5 व्या, आता चौथ्यावरुन तिसऱ्यावर आणण्याचं मोदीजींचं स्वप्न पूर्ण होईल, आणि आपला देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतांना दिसून येईल, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले. हा नवा भारत आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय आणि देशाचा डंका संपूर्ण जगात वाजवला जातोय. त्यामुळे, विरोधकांना ही एक मोठी चपराक आहे, कारण राजकारणात काम करत असताना मोदीजी देशाचा विचार करतात. देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा विचार करतात, विकसित भारत 2047 चा विचार पाहता दुर्दैवाने देशात आणि विदेशात गेल्यावर राहुल गांधी आणि इंडिया आघाडी त्यांच्यावर टीका करतात हे दुर्दैवी आहे, अशी खंत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.

हेही वाचा

मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *