Headlines

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाचा ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात प्रत्येकाची आयुष्य जगण्याची आणि यशाची व्याख्या ही वेगवेगळी असते. मात्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जिंकायचं असतं, त्यासाठी तो प्रचंड कष्ट करतो, मात्र जर या प्रयत्नाची दिशा चुकली तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधीही यश मिळून शकत नाही. त्यामुळे कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नेमकं काय करायचं आहे? कोणत्या दिशेला जायचं आहे? हे माणसानं ठरवणं खूप गरजेचं असतं, तरच तुम्हाला यश मिळू शकतं. अशाच चार गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला यशापासून कोणची थांबवू शकणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम – आर्य चाणक्य म्हणतात जर माणसाकडे संयम असेल तर जगातील कोणीच त्याचा पराभव करू शकत नाही. आयुष्यात तुम्हाला जेव्हा असं वाटेल की काहीच माझ्या मनासारखं घडत नाही, त्यावेळी थोड थांबा, परंतु संयम सोडू नका. ज्यावेळी तुमची वेळ येईल त्यावेळी अधिक जोमाने प्रयत्न करा यश तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच.

शिस्त – चाणक्य म्हणतात ज्या माणसाला शिस्त नाही, असा माणूस आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शिस्त ही असायलाच हवी.

शिक्षण – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ज्ञान पाहिजे, आणि हे ज्ञान तुम्हाला शिक्षणातून प्राप्त होतं.

कर्तव्यनिष्ठा – तुम्ही जे काम करणार आहात, ते पूर्ण मन लावून करा, तुम्हाला त्यात शंभर टक्के यश मिळणार असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *