
आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.
जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.
ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.
माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.
आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.