Headlines

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी



मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे (Transfer) आदेश जारी करण्यात आले आहेत. आज 18 नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्ण हे सध्या पुण्यातील (Pune) सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच, राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार IAS (IAS) अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. 

IAS अधिकाऱ्यांचे सध्याचे ठिकाणी आणि बदली झालेला पदभार

1. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

4. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, SSC आणि HSC बोर्ड, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

5. अंजली रमेश (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *