Headlines

Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर

Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरशी संबंधित एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. मुंबईहून पुण्याकडे एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग परिसरात उतरवण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. छगन भुजबळ यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पायलटच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. “हा अपघात नव्हता. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. काळजी करण्याचे कारण नाही. हेलिपॅड नीट दिसत नसल्यामुळे पायलटने कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवले,” असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *