
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईत सुमारे 40 हजार रुपयांचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे समोर आले. तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी केलेल्या कारवाईत त्या ठिकाणाहून 14 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.
याचदरम्यान डोंबिवलीमध्ये गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर फसवणुकीची घटना घडली आहे. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून कापड व्यापारी अरुण मोरे यांची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.