Headlines

अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी

अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी



मुंबई : सरकारी नोकरी (Job) ही सध्याच्या काळात स्वप्नवत झाली आहे, त्यामुळेच शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंतच्या कुठल्याही नोकरीसाठी एका जागेला हजारो, लाखो अर्ज असतात. एमपीएससी (MPSC) परीक्षेत ही स्पर्धा स्पष्टपणे दिसून येते. त्यातच, अनुकंपा जागेवरही नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड असते. दुर्दैवी घटनेमुळे वडिल किंवा आईच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात अनुकंपावरील उमेदवारांच्या नोकऱ्या काही तांत्रिक कारणास्तव रखडल्या होत्या. तर, एमपीएससी परीक्षेतून लिपिक पदावर निवड झालेल्यांनाही नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. मात्र, आता या सर्व उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली असून येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी 5122 एमपीएससीतर्फे निवड झालेल्या उमेदवारांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार असून, एकाचवेळी तब्बल 10,309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा मुलास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. परंतु तांत्रिक अडचणी व इतर विलंबामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. ही संवेदनशील बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना देऊन सातत्याने आढावा घेतला. त्यानंतर नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले आणि त्यामुळेच एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळणार आहेत. या सोबतच एमपीएससीच्या लिपिक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळतील. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी कोकण विभागातील 3078 उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. विदर्भातून 2597, मराठवाड्यातून 1710, पुणे विभागातून 1674 आणि नाशिक विभागातून 1250 उमेदवारांचा समावेश आहे. 

हेही वाचा

Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *