महापालिका उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्याची कॉंग्रेसची मागणी.

महापालिका उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्याची कॉंग्रेसची मागणी.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या महासचिव विद्या भांडेकर यांनी नेरूळ विभाग कार्यालयातील महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

महापालिकेचे नेरूळ सेक्टर दोनमध्ये सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात सकाळी व सांयकाळी स्थानिक परिसरातील रहीवाशी मोठ्या संख्येने फिरण्यास येत असतात. परिसरातील लहान मुले उद्यानातील खेळण्यांवर खेळण्यासाठी येत असतात. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु असल्याने लहान मुले उद्यानात सतत असतात. या उद्यानातील खेळणी तुटल्याने (बदक) मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही व तुटलेल्या खेळण्यांमुळे उद्यानाला बकालपणा आलेला आहे. उन्हाळी सुट्टीत मुलांना उद्यानातील खेळण्यांचा आनंद घेता यावा यासाठी आपण तातडीने उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *