नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सफाई कंत्राटी कामगार आमच्या संघटनेचे सभासद असून त्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या महापालिका स्थरावर प्रलंबित आहेत. संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून हि संबंधित विभागाने कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे कामगारामध्ये महापालिका प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील मध्ये कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून त्यांना वर्षाचे २४० दिवस काम दिले जाते. हा त्या कामगारावर अन्याय आहे. २५० दिवस व्यतिरिक्त कामागारांना इतर दिवसाचे वेतन व सुविधा दिल्या जात नाहीत. नवी मुंबई महापालिकेच्या पत्र क्र जा क नमुमपा/माध्य. शिक्षण /१९१/२०११ दिनांक २७/०७/२०११ सदर पत्राच्या अनुशंघाने संबंधित सफाई कामगारांना ३१३ दिवसाचे वेतन देण्याचे पत्रात नमूद आहे परंतु अचानकपणे सदर निर्णयात बदल करून ल्या कामगारांना २४० दिवसाचे वेतन दिले जाते. आपणास विनंती आहे कि सफाई कंत्राटी कामगारांना २७/०७/२०११ रोजीच्या निर्णयानुसार ३१३ दिवसाचे वेतन मिळावे ही मागणी युनियनने केली.