Cricket : ऑस्ट्रेलियानंतर भारत मोठ्या उलटफेरची शिकार, यूएईकडून 7 विकेट्सने पराभव

Cricket : ऑस्ट्रेलियानंतर भारत मोठ्या उलटफेरची शिकार, यूएईकडून 7 विकेट्सने पराभव
Cricket : ऑस्ट्रेलियानंतर भारत मोठ्या उलटफेरची शिकार, यूएईकडून 7 विकेट्सने पराभव


क्रिकेट चाहत्यांना 13 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उलटफेर पाहायला मिळाला. झिंबाब्वेने वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला. झिंबाब्वेने 170 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 146 वर गुंडाळलं. झिंबाब्वेने यासह वर्ल्ड कप मोहिमेतील सलग आणि एकूण दुसरा विजय साकारला. त्यानंतर चाहत्यांना काही मिनिटांत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियानंतर भारताला दुबळ्या संघाकडून पराभूत व्हावं लागलं आहे.

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला बँकॉकमध्ये वूमन्स आशिया कप रायसिंग स्टार्स 2026 स्पर्धेला आजपासून (13 फेब्रुवारी) सुरुवात झालीय. स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात इंडिया ए वूमन्स टीमला यूएईकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. यूएईने या विजयासह एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला.

सामन्यात काय झालं?

इंडिया ए वूमन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. मुंबईकर कर्णधार राधा यादव हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतावरच उलटा पडला. यूएईच्या गोलंदाजांसमोर भारताने गुडघे टेकले. मात्र अनुष्का शर्मा आणि तनुजा कंवर या दोघींनी लाज राखली. अनुष्काने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर तनुजाने 34 धावांचं बहुमुल्य योगदान दिलं. त्यामुळे भारताला 100 पार पोहचता आलं.

भारताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. यूएईकडून समायरा धर्निधरका हीने 3 विकेट्स मिळवल्या. कॅप्टन इशा ओझा आणि वैष्णवी महेश या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर इतर दोघींनीही प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

यूएईचा जबरदस्त विजय,  इंडिया ए टीमचा 7 विकेट्सने धुव्वा

यूएईच्या टॉप ऑर्डरचा धमाका

यूएईच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात केली. कॅप्टन इशा ओझान ही यूएईच्या विजयाची नायिका ठरली. तसेच थीर्था सतिश आणि समायरा धर्निधिर्का या दोघींनी विजयात योगदान दिलं. थीर्थाने 10 धावा केल्या. तर समायराने 34 धावांची खेळी केली. तर इशाने इतर दोघींना सोबतीला घेऊन यूएईला विजयापर्यंत पोहचवलं. इशाने 61 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. तर भारतासाठी राधा यादव, प्रेमा रावत आणि तनुजा कंवर या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *