Headlines

Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम


भारतात आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना एका खेळाडूने तडकाफडकी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक लावला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी व्हॅन डर डुसे या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाजाने फक्त एका प्रकारातून नाही तर तिन्ही फॉर्मेटला (कसोटी+एकदिवसीय आणि टी 20i) एका झटक्यात अलविदा केला आहे. रासीने हा निर्णय त्याला वार्षिक करारातून वगळल्याने घेतला असल्याचा म्हटलं जात आहे. मात्र निवृत्तीबाबत ठोस कारण समजू शकलेलं नाही. रासीने सोशल मीडियावरुन आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. तसेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने रासीचे त्याने दिलेल्या योगदानासाठी आभार मानत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने 2026-2027 या कालावधीसाठी 1 एप्रिल रोजी वार्षिक करार जाहीर केला. त्यानुसार क्रिकेट बोर्डाने वार्षिक करारात एकूण 19 खेळाडूंना स्थान देण्यात आलं. तर अनेक खेळाडूंना वार्षिक करारातून डच्चू देण्यात आला त्यात रासीचाही समावेश आहे.

वार्षिक करारातून कुणाला डच्चू?

रासी व्यतिरिक्त लिझाड विलियम्स, नांद्रे बर्गर, डेव्हिड मिलर आणि गेराल्ड कोएत्झी या खेळाडूंनाही क्रिकेट बोर्डाने वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

रासीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

रासीने सोशल मीडिया पोस्टमधून दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणं हे त्याच्यासाठी गर्वाची बाब असल्याचं म्हटलंय. तसेच रासीने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

रासी व्हॅन डर डुसे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

रासीने दक्षिण आफ्रिकेचं कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व केलं. मात्र रासी सर्वाधिक एकदिवसीय क्रिकेट खेळला. रासीने दक्षिण आफ्रिकेचं 71, कसोटीत 18 आणि टी 20i क्रिकेटमध्ये 57 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

रासीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 6 शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे रासीने ही 6 शतकं एकदिवसीय क्रिकेटमध्येच लगावली आहेत. रासीने तिन्ही प्रकारात मिळून जवळपास 5 हजार धावा केल्या आहेत. तसेच रासी गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. रासीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा ऑगस्ट 2025 मध्ये खेळला होता.

रासी आयपीएलमध्ये किती सामने खेळला?

दरम्यान रासी आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. मात्र त्याला फार संधी मिळाली नाही. रासीने आयपीएल स्पर्धेतील एकूण 3 सामन्यांमध्ये एकूण 22 धावा केल्या आहेत. रासी आयपीएल स्पर्धेत अखेरचा सामना हा 11 मे 2022 रोजी खेळला होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *