Headlines

Crop Loss | अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल

Crop Loss | अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
Crop Loss | अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल


महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरत नाही तोच यंदाच्या अवकाळी पावसाने त्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे. परभणी जिल्ह्यात आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या असून गावरान आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील त्रिद्दी परिसरातही आंबा पिकाला फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील हळद पिक अवकाळी पावसामुळे भिजले असून अर्धापूर तालुक्यात हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. सटाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साखरी येथे पावसासोबत गारपीट झाल्याने कांदा, बाजरी, गहू आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *