
Mumbai CSMT Protest : मध्य रेल्वे (Central Railway) कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली, या दरम्यान झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशातच आता मध्य रेल्वे युनियनच्या अघोषित संपादरम्यान दोघांच्या मृत्यू प्रकरणी वकीलाचं मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेसह, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि लोहमार्ग पोलिसांना नोटिस बजावत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची या पत्रातून मागणी करण्यात आली आहे.
Mumbai CSMT Protest : न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र, नेमकी मागणी काय?
अपघाताचा घटनाक्रम, प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात केलेल्या उपाययोजना आणि अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना केलेली मदत या सगळ्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश यातून देण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसुचनेशिवाय किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसताना, करण्यात येणाऱ्या अघोषित संपविरोधाय मार्गदर्शक तत्वे काढण्याचे आदेश देण्याची या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे. तर मृत पावलेलेल्यांच्यां नातेवाईकांना अंतरिम नुकसानभरपाई तसेच जबाबदारी निश्चित करण्यासाठी कालबद्ध चौकशीची देखील या पत्रातून मागणी करण्यात आली आहे.
Train Accident : अपघात प्रकरणावरून लोहमार्ग पोलिस आणि मध्य रेल्वेत जुंपली
दुसरीकडे, मुंब्रा रेल्वे अपघातात लोहमार्ग पोलिसांनी ज्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला, याबाबत रेल्वेच्या तज्ञांचं मत विचारात घेतलं नाही. ज्या अहवालाचा दाखला देत इंजिनिअरवर गुन्हा दाखल केला आहे, तो अहवाल मध्य रेल्वेकडून मागवण्यात आला असता अद्याप रेल्वेला तो अहवाल देण्यात आलेला नाही. या अपघाताबाबत रेल्वेच्या वरिष्ठ इंजिनिअरकडून अहवालाबाबतची वस्तूस्थिती समजून घ्यायला हवी होती. पण अपघाताबाबत रेल्वेची तांत्रिक बाजू समजून न घेता गुन्हा दाखल केल्याचा मध्य रेल्वेकडून आरोप करण्यात आला आहे. परिणामी आता या प्रकरणी लोहमार्ग पोलिस आणि मध्य रेल्वेत मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणावरून जुंपली असल्याचे समोर आलं आहे.
Mumbra Train Accident : मुंब्रा रेल्वे अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंब्रा रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पाच मित्र प्रवासी भरधाव लोकलमधीन पडून जखमी झाले होते . याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोघा अभियंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. लोहमार्ग पोलिसांच्या कारवाई विरोधात सहा ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाची हाक दिली. अकस्मात संपादरम्यान लोकल जैसे थे उभ्या करण्यात असल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रुळावरून पायी चालण पसंत केल. मात्र त्या दरम्यान मागून येणाऱ्या लोकलने त्यांना उडवलं होत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा