आज मुंबई आणि भिवंडी परिसरात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. भिवंडीतील सरवली MIDC मधील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील दादर पश्चिमेकडील स्टार मॉलमध्ये असलेल्या McDonald’s च्या किचनला आग लागली. McDonald’s च्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात कागदी सामान असल्याने आगीचा भडका उडाला. भिवंडीतील आग ही मंगलमूर्ती डाईंग कंपनीच्या तीन मजली इमारतीला लागली होती आणि आगीने रौद्ररूप धारण केले होते. दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Source link
New Thinking, New Style, Super Coverage