
Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतरही काही नागरिक नवनवीन शक्कल लावत कायद्यालाहि जुमानत नसल्याचे समोर आलं आहे. परिणामी मुंबई महापालिकेच्या वतीने आता कडक धोरण राबवले असून अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Mahanagar Palika)अंतर्गत असलेल्या 44 कबूतर खान्यावर महापालिकेने केलेली कारवाईची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये दिनांक 13 जुलै पासून ते 3 ऑगस्टपर्यंत पालिकेने आतापर्यंत ऐकून 44 कबूतरखाने प्रकरणी 142 केसेस दाखल केल्या आहेत. सोबतच महापालिकेने 3 ऑगस्टपर्यंत 68,700 रुपये इतका दंड वसूल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सगळ्यात जास्त दंड हा वादात आणि चर्चेत असलेल्या दादर पश्चिम येथील कबुतरखान्याच्या ठिकाणावरून वसूल करण्यात आला आहे. दादर पश्चिम येथील कबुतरखाना येथून 22,200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असून 51 जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या वार्ड रचनेप्रमाणे वार्ड ‘ए‘ पासून ते वॉर्ड ‘टी‘ पर्यंत ऐकून 44 कबूतरखान्यांवर पालिकेचे लक्ष आहे.
वार्ड ‘ए‘ पासून ते वॉर्ड ‘टी‘ पर्यंत ऐकून 44 कबूतरखान्यांवर पालिकेचे लक्ष
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड भागात वार्ड पी पूर्व येथे 5 कबुतरखाने आहेत. तर मालाड पच्छिम भागात ही वार्ड पी पश्चिम भागात ही 5 कबूतर खाने आहेत. वार्ड के वेस्ट येथे 4 कबुतरखाने आहेत, तर दक्षिण मुंबईतील डी वार्डमध्ये ही गिरगाव चौपाटी आणि आजूबाजूच्या परिसरात 4 कबुतरखाने आहेत.
वार्ड जी दक्षिण या भागात 3 कबुतरखाने आहेत. विलेपार्ले पूर्व-अंधेरी पूर्वचा जो के पूर्वचा वार्ड आहे तिथेही 3 कबूतरखाने आहेत. गोरेगाव पच्छिम भागात ही वार्ड पी पश्चिमच्या भागात ही 3 कबुतरखाने आहेत. दक्षिण मुंबईतील ए वार्डमध्ये 2 कबूतर खाने आहेत. तसेच एफ उत्तरमध्ये माटुंगा परिसरात दोन कबुतरखाने आहेत. वांद्रे- सांताक्रुझ पश्चिमला 2 कबुतरखाने आहेत. जे एच पश्चिम वार्ड मध्ये येतात. बोरिवली-दहिसर भागात ही प्रत्येकी 2-2 कबुतरखाने आहेत. जे वार्ड आर मध्ये आणि आर उत्तर मध्ये येतात. भांडुप मध्येही 2 कबूतर खाना आहे. वार्ड एफ दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, आर दक्षिण आणि वार्ड एन येथे प्रत्येकी एक-एक कबूतरखाने आहेत.
दादरच्या कबूतरखाना परिसरातील बंदोबस्तात अचानक वाढ
दादरच्या कबूतरखाना परिसरातील बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली असून स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक देखील तैनात ठेवण्यात आलेल आहे. बुधवारी मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याविरोधात इथे मोठे आंदोलन करण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फ़ौजफाटा येथे तैनात ठेवण्यात आला असून दादरच्या कबूतरखान्याला सध्या पोलीस छावणीच स्वरूप आलय.
आणखी वाचा
आणखी वाचा