Headlines

Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्याचा वाद संपता संपेना, आता जैन मुनी आझाद मैदानात उपोषणाला बसणार, तारीखही ठरली

Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्याचा वाद संपता संपेना, आता जैन मुनी आझाद मैदानात उपोषणाला बसणार, तारीखही ठरली
Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्याचा वाद संपता संपेना, आता जैन मुनी आझाद मैदानात उपोषणाला बसणार, तारीखही ठरली



मुंबई : दादर येथील कबुतरखान्याचा वाद  (Dadar Kabutar Khana) काही केल्या थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. महापालिकेने कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात (Jain Community) संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्हं आहेत. 

दादर येथील कबुतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाचा निषेध करत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी काही दिवसांपूर्वी प्रसंगी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिला होता. आता मात्र त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.

Nileshchandra Vijay Hunger Strike : कबुतरखाना बंदीविरोधात जैन आक्रमक

जैन समाजाचं मत आहे की कबुतरखाने हे त्यांच्या धार्मिक परंपरेचा भाग आहेत आणि त्यांना बंद करणं म्हणजे धार्मिक भावनांवर आघात आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. 

Dadar Kabutar Khana : कबुतरांच्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना सभा

एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कबुतरखान्याला विरोध असताना दुसरीकडे जैन समूदाय  मात्र कबुतरखाना सुरू करण्यासाठी अडून बसल्याचं चित्र आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचं सांगत जैन समूदायाने 11 ऑक्टोबर रोजी कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी देखील या प्रार्थनासभेतून करण्यात आली.

Mumbai Kabutarkhana News : आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक

जैन समूदायाच्या या भूमिकेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली. ‘कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान’ अशा आशयाचे फलक लावून त्यांनी जैन समूदायाच्या भूमिकेचा निषेध केला. 

Dadar Kabutar Khana Controversy : मुंबईत कबुतरांचा वाद पुन्हा पेटणार?

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा सपाटा लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, जैन समाजाने (Jain Community) या कारवाईला कडाडून विरोध केला होता. याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. 

मुंबईच्या दादर परिसरात जैन समाजाने रस्ता रोखून धरत मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री चाकू आणि सुऱ्यांनी फाडून काढली होती. मात्र, यानंतरही मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या भूमिकेवर ठाम राहिली होती.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *