
Dadar Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांचा विषय न्यायप्रविष्ट असताना कोणीही उठून कबुतरांना (Pigeons) दाणे टाकायला सुरुवात करतात. हे कुठल्या कायद्यात बसते? कालदेखील अनेकांनी फुटपाथवर पाच किलो धान्य ओतलं होते. किराणा दुकानातून दाणे घ्यायचे आणि रस्त्यावर टाकायचे. लोकांना चालण्यासाठीचे फुटपाथ त्यासाठी ठेवले आहेत का? दादर कबुतरखान्याबाहेर (Dadar Kabutar Khana) जैन समाजाने केलेले आंदोलन टोकाचा आणि अतिरेकी विचार आहे. अशाप्रकारे उद्रेक करणं कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल विचार शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला.
काल जैन समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्मसंकटात टाकले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील 51 ठिकाणी कबुतरखाने कोणी सुरु केले? उच्च न्यायालयाच्या निकालात पान क्रमांक सहावर लिहले आहे की, या जागा पूर्वी पाणपोई होत्या. लोकांनी तिकडे दाणे टाकून त्याचे कबुतरखाने केले, असे कायंदे यांनी म्हटले. जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव असतो. त्या पतंग महोत्सवात अनेक पक्षी मांजाने मान कापून मरुन पडतात. पक्ष्यांचे हात-पाय कापले जातात. तिकडे रुग्णवाहिका उभ्या असतात. मग तेव्हा धर्माचा विषय येत नाही का? कबुतरांमुळे होणारा त्रास हा वैज्ञानिक विषय आहे, यामध्ये धर्म आणू नये. कबुतरं फक्त दाणे खात नाहीत, कीटकही खातात. हे लोक बोलतात, निवडणुकीत नोटाचं बटण दाबून धडा शिकवू. जैन धर्मात असं कुठे लिहलंय? कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर स्वत:च्या इमारतीमधील टेरेसवर टाका. यांच्या विष्ठेतून निर्माण होणाऱ्या फंगसमुळे इतके लोक मरतात. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार? जे लोक मेलेत या आजारपणामुळे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? जैन समाजाला विनंती आहे की, हा अतिरेकीपणा थांबवा, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले.
कबुतरांना देवाने पंख दिले आहेत. ते त्यांचं खाद्य शोधतात. तुम्ही त्यांना सवय लावली आहे, तुम्ही दाणे टाकता म्हणून ते तिथे येतात. तुम्ही अन्य ठिकाणी धान्य टाका, कबुतरं आपोआप तिकडे येतील, त्यांना सवय लागले. मी प्राणीशास्त्रात पीएचडी केली आहे. वाटल्यास तुम्ही प्राणीतज्ज्ञांना विचारा. जैन धर्मातही अनेक डॉक्टर आहेत, असेही मनिष कायंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा
गुरु महाराजांचा आदेश, सहकार्य करा, कबुतरखान्यावरील जैन आंदोलकांना धर्मगुरुंचं आवाहन!
आणखी वाचा