दादरच्या कबूतरखान्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेने आज वेगळे वळण घेतले. कबूतरखान्याला लावलेल्या ताडपत्रीमुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने आज सकाळी आंदोलन केले. सकाळी दहा वाजता पूर्वनियोजित आंदोलन रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अचानक साडे दहाच्या सुमारास शेकडो आंदोलक दादर कबूतरखाना परिसरात जमा झाले. आंदोलकांनी हातात सुऱ्या घेऊन ताडपत्री बांबूने लावलेल्या डोळ्या तोडल्या आणि ताडपत्री काढून टाकली. आंदोलकांनी रस्ता अडवत ताडपत्री फाडून टाकली. ताडपत्री हटवताच कबूतरखाना पुन्हा सुरू झाला आणि कबुतरे पुन्हा कबूतरखान्यात जमली. आंदोलक सोबत कबूतरांसाठी धान्यही घेऊन आले होते. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर आता सरकारकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कबूतरखान्यावरून सुरू असलेले हे नाट्य आणि जैन समाजाची आक्रमक भूमिका हा सध्या चर्चेचा विषय आहे.
Source link
New Thinking, New Style, Super Coverage