Headlines

Dasara Melava: दसरा मेळाव्याचे निमित्त, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; शिवाजी पार्कवरुन होणार शिवसेना-मनसे युतीची घोषणा?

Dasara Melava: दसरा मेळाव्याचे निमित्त, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; शिवाजी पार्कवरुन होणार शिवसेना-मनसे युतीची घोषणा?
Dasara Melava: दसरा मेळाव्याचे निमित्त, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; शिवाजी पार्कवरुन होणार शिवसेना-मनसे युतीची घोषणा?



मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे सरकत असताना दुसरीकडे शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा येत्या 2 ऑक्टोबरला होत आहे. शिवतीर्थावर पार पडणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येणार का? त्यांना निमंत्रण दिले जाणार का? या दसरा मेळाव्याला युती संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार का? अश्या अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी खरंच या दसऱ्याचा मुहूर्त साधला जाणार का? किंवा या दसरा मेळाव्याला पुन्हा एकदा दोन भाऊ एकत्र दिसणार का? दसऱ्याला (Dussehara) दोन बंधूंच्या वैचारिक सोन्याचं आदान-प्रदान होणार का? यासंदर्भात राजकीय अंदाज काय आहेत हे पाहुया, तशा प्रकारचा घटनाक्रम देखील दिसून येईल.

मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरुन घेण्यात आलेल्या मेळाव्याला आधी दोन भाऊ एकत्र आल्यानतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवात सहकुटुंब राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन गणपतीते दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मावशींना भेटायला आलेले पाहायला मिळाले, त्यामुळेही अचानक राजकीय वर्तुळाच राकीय चर्चा सुरू झाल्या. आता, मुहूर्त आहे दसऱ्याचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात निर्णय झाला नसला तरी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीचा निर्णय कधी? यावर दसऱ्याचा मुहूर्त साधला जाईल अशी चर्चा होती. दोन भाऊ दसरा मेळाव्याला एकत्र व्यासपीठावर दिसतील, असेही म्हटलं जात आहे. त्यावर, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 58 वर्षाची परंपरा आहे, या दसरा मेळाव्यात आधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे विचारांचे सोनं वाटून शिवसैनिकांनी आशीर्वाद द्यायचे. आता, शिवसेना पक्षप्रमुख हे दसरा मेळाव्याला भाषण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिशा देतात आणि विचारांचा सोनं राज्यभरातून आलेला शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लुटतो. त्यामुळे पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावर येण्याची शक्यता जरी धूसर वाटत असली दसऱ्याच्या सणाला पुन्हा दोन भावांची भेट होण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. मात्र, यावर मनसे नेत्यांकडून जो काही निर्णय असेल तो निर्णय राज ठाकरे घेतील असं उत्तर देण्यात आलं आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरेंचे शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. मनसेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या भाषणात नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल. यात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय पक्षाच्या मेळाव्यात नाही तर कौटुंबिक भेटीतून तरी दोन भाऊ परत एकत्र दिसतात का? याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे आणि नागरिकांचेही लक्ष असेल.

दोन बंधुंमध्ये विचारांचे आदान-प्रदान

शिवसेना दसरा मेळाव्याची परंपरा, पक्षाचे नियम, पक्षाचा मेळावा या सगळ्यामुळे जरी दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यास किंवा व्यासपीठावर आणण्यास काही मर्यादा येत असल्या तरी या दसऱ्याच्या मुहूर्तावर संजय राऊत म्हणतात तसं वैचारिक सोन्याचा आदान-प्रदान दोन बंधूंमध्ये होणार? पुन्हा एकदा दोन भावांची भेट दसरा सणाच्या दिवशी पाहायला मिळणार का? युती संदर्भातल्या चर्चांमध्ये पुढे जाऊन एक महत्त्वाचं पाऊल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उचलले जाणार का? याकडे विशेष लक्ष असणार आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *