Headlines

Dattatray Bharne | राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; दत्ता भरणे यांचा ठाम विश्वास

सध्याच्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा जोर धरून आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे प्रतिक्रिया देत म्हणाले, विलिनीकरणाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच बोलतील. सुनेत्रा पवार विलिनीकरणावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यावर सुनेत्रा पवार ह्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून राज्यशासनाकडून जे काही कामे आहेत, त्याबद्दल दिल्लीत बैठक झाली. बैठकीत अजित दादांच्या पेंडिंग विषयावरही चर्चा झाली. त्यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा देखील होता का? असे प्रश्न उपस्थित केले गेले, यावर आपण बोलण्यापेक्षा स्वतः सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील असं देखील दत्ता भरणे म्हणाले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *