
Delhi Blast Alert: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेलीय. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट (Delhi Red Fort Blast) झाला. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि नागपूरमधील संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय परिसराला तिहेरी स्वरुपाच्या सुरक्षा घेरा घालण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईतही रेल्वे स्थानकांवर डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली जात आहे आणि संशयित व्यक्तींची चौकशी होत आहे.
Nagpur News : नागपूरच्या संघ मुख्यालयाला CISF, SRPF आणि पोलिसांची सुरक्षा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय, रेशीमबाग येथील स्मृती भवन, दीक्षा भूमी आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. संघ मुख्यालयाला सीआयएसएफ (CISF), एसआरपीएफ (SRPF) आणि नागपूर शहर पोलिसांचा (Nagpur City Police) असा तिहेरी सुरक्षा वेढा असून, परिसरातील प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे’. याव्यतिरिक्त, अजनी आणि इतवारी रेल्वे स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संपूर्ण शहरात दक्षता बाळगली जात आहे.
Pune Alert : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ
अशातच, सगळ्या पुणेकरांचं श्रधस्थान असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनाला येतात आणि जया वेळी दिल्लीसारख्या स्फोटाच्या घटना घडतात त्यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराला मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात येते. BDDS पथकाच्या आझाद नावाच्या कुत्र्याने आधी दगडूशेठ गणपती समोर नथमस्थक झाला आणि नंतर संपूर्ण मंदिराची पाहणी केली.
Gajanan Maharaj Mandir Shegaon: संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली
दिल्ली येथे काल सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी करून आज सोडण्यात येत आहे तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहे.
मुंबईतील CSMT वर कडक बंदोबस्त, RPF जवानांकडून प्रवाशांची कसून तपासणी
‘दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस असू देत किंवा महाराष्ट्रमध्ये सर्व ठिकाणी आता पोलीस हे सतर्क झाले आहेत’. संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली जात असून, विशेषतः दुसऱ्या राज्यांमध्ये जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले आहे. RPF चे जवान मेटल डिटेक्टर आणि श्वान पथकाच्या (Dog Squad) मदतीने प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करत आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल. मुंबईतील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी वाचा