नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देणेची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.
महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली असून अधिकाधिक कर्मचाऱ्यांचे वेतन २१ हजारांहून अधिक झालेले आहे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २१ हजार रुपयांहून अधिक आहे, त्या कर्मचाऱ्यांना ई. एस. आय (राज्य कामगार विमाअधिनियम १९५०) नियम ५० नुसार लागू होत नाही. त्यामुळे ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांचे ईएसआयचे पैसे जमा करणे बंद केले आहे, यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुविधेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्याच्या काळात वाढते आजार व महागडे वैद्यकीय उपचार पाहता वेतन वाढ झाली म्हणजे कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. एकादा गंभीर आजार कर्मचारी अथवा त्याच्या परिवारास झाल्यास २९ हजार रुपये वेतनामध्ये उपचार करवून घेणे शक्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबावत महापालिकेने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या मेडीक्लेमसाठी प्रशासनाने ठेकेदाराला निर्देश द्यावेत. कर्मचारी आरोग्य संवर्धन ही ठेकेदाराची व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी तजवीज होणे आवश्यक आहे. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचा मेडिक्लेम न काढल्यास संबंधित ठेकेदाराचे देयक महापालिका प्रशासनाने देवू नये, प्रशासत्ताने ठेकेदारांना कर्मचाऱ्याऱ्यांचा मेडिक्लेम काढण्याचे निर्देश देवून या समस्येवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक आहे असे सांगितले.