Headlines

Devendra Fadnavis On Mahayuti Mininster: निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा…; मंत्र्यांच्या वर्तनाबाबत फडणवीसांची तीव्र नाराजी, शिंदे-पवारांना काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Mahayuti Mininster: निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा…; मंत्र्यांच्या वर्तनाबाबत फडणवीसांची तीव्र नाराजी, शिंदे-पवारांना काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Mahayuti Mininster: निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा…; मंत्र्यांच्या वर्तनाबाबत फडणवीसांची तीव्र नाराजी, शिंदे-पवारांना काय म्हणाले?


Devendra Fadnavis On Mahayuti Mininster: राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे (NCP Ajit Pawar Group) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांमध्ये मंत्र्यांसंदर्भात आलेल्या तक्रारींवर देवेंद्र फडणवीस यांन नाराजी दर्शवली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. तसेच मुंबईतील सावली बारमुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील चर्चेत आहेत. यामंत्र्यांबाबत विविध तक्रारी देखील दाखल होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कारवाई न केल्यास काहीही केलं तर चालतं, अशी भीती देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील अशी भावना देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे व्यक्त केली. 

माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय-

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय वापरला जाईल. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली. परंतु रमीची जाहीरात आली होती, ती मी स्कीप करत होतो. आपण काहीही चुकीचं केल नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले होते.

महायुतीतील वादग्रस्त मंत्री व आमदारांच्या वर्तनावर ‘मुंबई तरुण भारत’मधूनही परखड भाष्य-

महायुतीतील वादग्रस्त मंत्री व आमदारांच्या वर्तनावर ‘मुंबई तरुण भारत’मधूनही परखड भाष्य केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांचे दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ मधून महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांची कानउघडणी करण्यात आली. मंत्र्यांचे वर्तन सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी छबीवर आधारित महायुतीच्या प्रतिमेला काही आमदार आणि मंत्र्यांमुळे धक्का बसतोय.नेत्यांनी बेजबाबदार वर्तन टाळण्याचाही ‘मुंबई तरुण भारत’च्या संपादकीयमधून सल्ला देण्यात आला आहे. 

राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *