
Devendra Fadnavis On Eknath Shinde Minister मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घातला. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. भाजपकडून करण्यात येणाऱ्या फोडाफोडीमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिले.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे मंत्री (Eknath Shinde Minister) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दालनात भेटीसाठी गेले होते. यावेळी तुम्ही जे करताय, ते योग्य नाही, असं शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरुन देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार देखील केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदेंसमोर चांगलेच सुनावले. गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले हे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटीला जात नाराजी व्यक्त करायला गेले होते. यावेळी तुम्ही उल्हासनगरमध्येही हेच करताय, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या या मंत्र्यांना सुनावलं.
फडणवीसांनी पुराव्यासह झाड झाड झाडलं, नेमकं काय घडलं? (Devendra Fadnavis vs Eknath Shinde)
1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच कॅबिनेट बैठकीस अनुपस्थित राहणारे कॅबिनेट मंत्र्यांची खरडपट्टी
2. एकनाथ शिंदे यांचे प्री कॅबिनेट बैठक उपस्थितीत राहिले मात्र कॅबिनेट बैठकीला उपस्थितीत राहील नसलेले मंत्री मुख्यमंत्री यांना भेटीस गेले.
3. त्याचवेळी एकनाथ शिंदे समोर उपस्थिती असतानाच फडणवीस यांनी शिंदेच्या मंत्र्यांवर फैलावर घेतल्याची सुत्रांची माहिती
4. शिंदे समोरच कानपिचक्या देत फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री यांची कोंडी केली
5. कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रवेश झाल्याची यादी ही मुख्यमंत्री यांनी वाचल्याची सुत्रांची माहीती
भाजपाच्या फोडाफोडीमुळे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री नाराज-
शिंदे गटाच्या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते.
शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची नाराजीची कारणे काय? (why shivsena shinde camp minister unhappy?)
- भाजप सेनेचे नेते ,नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत.
- ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उम्मीद्वार ला भाजप आपल्या पक्षात घेत आहे.
- शिंदेच्या अनेक नेत्यांना किव्हा पालकमंत्री ना , विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किव्हा निधी वळवला जातो
- येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही.
- निधी मिळवण्यासाठी ही शिंदेच्या मंत्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- संभाजी नगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत ,किव्हा युतीचा धर्म पाळला नाही.
संबंधित बातमी:
आणखी वाचा