Headlines

Devendra Fadnavis : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Devendra Fadnavis : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Devendra Fadnavis : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळं 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामं पूर्ण करावी लागतील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध निर्देश दिले. 

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत. 
 
शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत व टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित असून ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांची गती संथ असल्याचे नमूद करून आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत. 
 
 शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळांच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमानांच्या पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी. 

या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक सक्षम होईल.

दरम्यान, नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. त्यानिमित्तानं राज्य सरकारकडून जोरदार पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीच्या निमित्तानं विशेष लक्ष घातलेलं आहे. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *