गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील उसपिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहीलेस ऊस पिके नष्ठ होण्याची शक्यता आहे.
पाटगाव विभागामध्ये १ जून २०२४ ते आजअखेर ६१०४ मि.मी. पाऊस झाला असून हा पाऊस महाराष्ट्रात उच्चांकी आहे. त्यामुळे ऊस पिकाबरोबरच इतरही पिकांचे खूप नुकसान झाले आहे. सदर नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतक-यांना तातडीने शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. तरी कडगांव-पाटगांव बरोबरच वेसर्डे विभागातील पिकांचे पंचनामे करुन तातडीने शासकीय मदत मिळणेची गरज आहे.
तरी आपण आपले स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी पश्चिम भुदरगडचे नेते धनाजीराव देसाई यांनी केली..
तहसिलदारसो भुदरगड यांना निवेदन देताना बिद्री साखर कारखान्याचे संचालक, पश्चिम भुदरगडचे नेते मा.श्री. धनाजीराव देसाई, सरपंच सुभाष सोनार, बाळासाहेब भालेकर, आदी उपस्थित होते.