Headlines

Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?

Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?



Dharmendra Latest News: चतुरस्त्र अभिनय, वैशिष्टपूर्ण संवादफेक आणि प्रचंड देखणे रुप लाभलेल्या आणि अनेक दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra News) यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवले होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृती सुधारणा होत आहे. धर्मेंद्र यांच्या लोकप्रिय चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ आणि राकट नायकाच्या अनेक भूमिका साकारल्या होत्या. पण प्रत्यक्ष जीवनात धर्मेंद्र यांची ओळख एक सहृदयी व्यक्ती आणि मैत्रीला जागणारा माणूस अशी होती. याच मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असतानाही एका मराठी चित्रपटात काम केले होते. (Dharmendra Health updates)

ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी याबद्दलची एक आठवण सांगितली. मुंबईच्या चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे मित्र होते. या दोघांमध्ये घनिष्ट मैत्री होती. धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाल्यानंतरही हेमंत कदम यांना विसरले नाहीत. त्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नायक हे लहानसहान चित्रपटांमध्ये काम करण्यास फारसे उत्सुक नसायचे. मात्र, धर्मेंद्र यांनी आपल्या मित्रासाठी एका मराठी चित्रपटातील गाण्यासाठी शुटिंग केले होते. हेमंत कदम यांच्या ‘हिचं काय चुकलं’ या चित्रपटातील ‘घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव, अरे तू धाव….’ या गाण्यात विक्रम गोखलेंसोबत अभिनय केला होता. तेव्हाच्या बिझी शेड्युलमधून धर्मेंद्र यांनी दोन दिवस काढून चांदिवली स्टुडिओत या गाण्याचे शुटिंग केले होते. धर्मेंद्र यांच्यामुळे हा चित्रपट आणि ‘घेऊन टांगा सर्जा निघाला’ हे गाणे तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरले होते, अशी आठवण दिलीप ठाकूर यांनी सांगितली. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अद्याप डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा

लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्…; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती? 

‘याचं असं रडणं पाहावत नाहीय…’, वडिलांना भेटून निघालेला बॉबी देओल पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद, डोळांतले अश्रू पाहून चाहते चिंतेत

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *