Headlines

Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..

Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..
Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..


बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आज भारतासह जगभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये किती उत्सुक्ता, क्रेझ आहे ते या चित्रपटाच्या तिकीट सेलवरुन दिसून येतय. आज दुपारी 12 वाजेपर्यंतच या चित्रपटाने भारतात तब्बल 60 कोटीची कमाई केली आहे. येणाऱ्या दिवसात हा चित्रपट उत्पन्नाचे नवीन रेकॉर्ड करणार यात शंका नाही. हा चित्रपट आज प्रदर्शित होत असताना आता वादालाही सुरुवात झाली आहे. आज हा चित्रपट अधिकृतरित्या प्रदर्शित झाला. पण काल 18 मार्चला या चित्रपटाचे पेड प्रिव्यू शो आयोजित केले होते. काही कारणांमुळे काल या चित्रपटाचे पेड प्रिव्यू शो रद्द करावे लागले. त्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

चित्रपटाचे जे शो रद्द करावे लागले त्यासाठी गेयटी गॅलेक्सी आणि मराठा मंदिर थिएटरचे मालक मनोज देसाई यांनी जिओ स्टुडिओवर संताप व्यक्त केला आहे. जिओ स्टुडिओचं या चित्रपटाला बॅकिंग आहे. ‘आम्हाला केडीएमच दिलं नाही, तर आम्ही पिक्चर कसा चालवणार’ असा सवाल मनोज देसाई यांनी विचारला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

KDM म्हणजे काय?

अनेकांना KDM म्हणजे माहित नसेल, याचा अर्थ ‘कि डिलिव्हरी मेसेज’ होतो. एक छोटी एन्क्रिप्टेड XML फाईल असते. ही फाईल अनलॉक केल्यानंतरच स्क्रिनवर चित्रपट दिसू शकतो. निर्मात्यांकडून KDM मिळाल्याशिवाय थिएटर्सना चित्रपट प्रदर्शित करता येत नाही. “गेयटीमध्ये दोन, गॅलेक्सीत दोन आणि मराठा मंदिरमध्ये दोन शो होते. त्यामुळे माझ्या थिएटरमध्ये एकूण 6 शो कॅन्सल झाले. माझ्याच नाही संपूर्ण भारतात 500 थिएटर्समध्ये केडीएम न गेल्याने शो कॅन्सल करावे लागले” असं मनोज देसाई म्हणाले.

त्यांना त्याआधी चित्रपट सुरु करायचा नव्हता

“5 वाजताचा मुहूर्त होता आणि त्यांना त्याआधी चित्रपट सुरु करायचा नव्हता. आम्ही तयार झालो, तरी त्यांनी केडीएम पाठवली नाही. शेड्युल टाइमच्या दोन तासानंतर त्यांनी केडीएम पाठवली. त्यामुळे जवळपास 500 थिएटरमध्ये शो रद्द करावे लागले” असं मनोज देसाई म्हणाले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *